त्यांना होता विश्वास
विचारांचा वारसा आजच्या
पिढीने जपला खरा?
त्यांना होता विश्वास
हातावर लिहीले,छातीवर
कोरले,जपला वारसा ?
त्यांना होता विश्वास
जय भीम बोलण्यात
वाटतो गर्व,विचारांचा
वरासा जपला आजच्या
पिढीने?
त्यांना होता विश्वास
जय भवानी,जय शिवाजी
बोलताना वाटतो अभिमान,
विचारांचा वारसा जपला आजच्या
पिढीने?
त्यांना होता विश्वास
त्यांचा विचारांचा वारसा आज
आम्ही पुढे नेऊ,शिवबा,बाबानां
वाटले,आम्ही विचारांचे बनू पाईक
आम्ही तर आजही जातीचे नाईक,
घेऊन गेलो आम्ही त्यांना पुढे..
जंयती साजरी दारू ची पार्टी
नाचन्यात दंग आम्ही विचारांच्या
वारसेची कार्टी….
आज ते असते तर त्यांना
असणारा विश्वासाचे
काय झाले असते?
त्यांना होता विश्वास…..
भटक्या