गोल पोस्ट इतर प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं निधन

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं निधन

कोलकता, ३१ ऑक्टोबर २०२२: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. त्या ५९ वर्षांच्या होत्या. आज सकाळी कोलकत्ता येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पोटात पाणी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोनाली या बंगाली टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा होता. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं सर्वच कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक

सोनाली यांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, सोनाली यांच्या निधनानं खूप दुःख झाले. त्यांनी दादर कीर्ती (१९८०), हार जीत (२००२) आणि बंधन (२००४) या सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केलं होतं. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी जननी, गचोरा इत्यादी लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. त्यांच्या निधनाने अभिनय जगताची मोठी हानी झाली आहे. सोनाली चक्रवर्ती यांचे पती शंकर चक्रवर्ती आणि कुटुंबातील इतर सदस्य आणि चाहत्यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.

अभिनेत्री सोनाली चक्रवर्तींचं लग्न शंकर चक्रवर्ती यांच्याशी झालं होतं. सोनाली आणि शंकर चक्रवर्ती हे दोघेही बंगाली प्रेक्षकांचे लोकप्रिय चेहरे होते. हे जोडपे अनेक बंगाली टेलिव्हिजन शो, टेलिफिल्म आणि चित्रपटांचा भाग आहे. त्यांनी अनेक शो होस्ट केले आणि नॉन-फिक्शन प्रोजेक्टमध्ये काम केलं. त्यांची एक मुलगी मुंबईत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version