द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा

लखनऊ, २७ ऑक्टोबर २०२२: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना गुरुवारी मोठा झटका बसला. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या शिक्षेनंतर आझम खान यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार आली आहे. आझम खान यांना झालेली शिक्षा हा त्यांच्यासाठीच नव्हे तर समाजवादी पक्षासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

आझम खान यांना आज रामपूर न्यायालयाने आयपीसीच्या कलम १५३-ए, ५०५-ए आणि १२५ लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत दोषी ठरवले. आझम यांच्याविरुध्द तीन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिन्ही प्रकरणात ते दोषी आढळले आहेत. आझम खान यांनी भाषणादरम्यान पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यावरही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे.

आझम खान म्हणाले…

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नेते आझम खान म्हणाले, ‘मला न्यायाची खात्री आहे. ही पहिली पायरी आहे. आता इतर कायदेशीर मार्ग खुले आहेत. माझे संपूर्ण जीवन संघर्षमय आहे. जीव गमावला तरी आम्ही लढत राहू. पण हा न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे प्रत्येकाने मानला पाहिजे.

दरम्यान, आझम खान हे अखिलेश यादव यांच्यानंतर सपा पक्षातील दोन नंबरचे नेते मानले जातात. आझम खान हे रामपूरमधून दहा वेळा आमदार राहिले आहेत आणि सपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा