प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर एस पी बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

चेन्नई, २५ सप्टेंबर २०२०: प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे चेन्नई येथे आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७४ होते. आज दुपारी त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी पत्रकारांना त्यांच्या निधनाची पुष्टी केली.

प्रख्यात कलाकार एस.पी. बालसुब्रमण्यम यांना कोविड १९ या साथीच्या रोगाची लागण झाल्याने या महिन्याच्या ५ तारखेला शहरातील कॉर्पोरेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर विषाणूचा भार ओसरला, परंतु केवळ त्यांच्या महत्वाच्या अवयवांचा तीव्र परिणाम त्यांचावर झाला यामुळे त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांना व्हेंटिलेटर आणि ईसीएमओ चा पुरवठा देण्यात आला.

पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी भारतीय भाषांमधील १६ भाषेमधील एकाच कलाकाराद्वारे ४० हजारांपेक्षा जास्त गाणे गाण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा