हिंगोली जिल्ह्यातील बाभुळगांव येथे प्रसिद्ध येडोबा महाराज यात्रेला सुरुवात

10

हिंगोली, २४ फेब्रुवारी २०२४ : हिंगोली जिल्ह्यात सेनगांव तालुक्यातील बाभुळगांव या ठिकाणी येडोबा महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने काल सकाळी ५ वाजल्यापासून हजारो भाविकांनी येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तसेच बाभुळगांव येथील येडोबा महाराज यात्रेनिमित्ताने आज पौर्णिमेनिमित्त नवस फेडण्यासाठी धगधगत्यावरून निखार्‍यावरून चालण्याची शेकडो वर्षाची परंपरा नागरिकांनी कायम ठेवली आहे. या यात्रेनिमित्त विविध क्रिडासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे येडोबा महाराज संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रभू नांगरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा