दिलजीत दोसांझच्या गाण्यांवर थिरकले चाहते, एंट्री घेताच मंचाचा घेतला दाबा

40

कोचेला, १६ एप्रिल २०२३ : दिलजीत दोसांझने मंच थरारून टाकला आणि त्याच्या गाण्याचा जोरावर एक वेगळाच माहोल बनवला असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. कोचेला व्हॅली म्युझिक अँड आर्ट फेस्टिव्हल २०२३ मध्ये परफॉर्म करणारा हा पंजाबी गायक पहिला भारतीय कलाकार बनला आणि त्याने एन्ट्री करतानाच मंचाचा ताबा घेतला.

कोचेला २०२३ मध्ये दिलजीत दोसांझ

या खास मैफिलीसाठी अभिनेता-गायकाने त्याच्या थेट परफॉर्मन्सदरम्यान, पंजाबमधील पुरुषांसाठी एक काळा कुर्ता आणि तांबा हा पारंपारिक पोशाख घातला होता. आजच्या आधी १६ एप्रिल ला कोचेलाच्या अधिकृत ट्विटर हँडलने देखील दिलजीतच्या कामगिरीची झलक त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली होती. या व्यतिरिक्त, दिलजीतने कोचेला येथे त्याच्या बॅकस्टेज तयारीची झलक देखील शेअर केली. ज्यामध्ये त्याने ब्लॅक हॉटसह फंकी ब्लू कॉर्ड सेट परिधान केला आहे.

कोचेला संगीत महोत्सव हा जगातील सर्वात प्रसिद्ध संगीत महोत्सवांपैकी एक आहे, जो कॅलिफोर्नियामध्ये सलग दोन आठवडे चालु असतो. हा कार्यक्रम प्रत्यक्षात पाहायला मिळणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. या वर्षी महोत्सवासाठी कलाकारांची एक मनोरंजक लाइनअप आहे. ज्यामध्ये दक्षिण आशियाई प्रतिभा आणि पाकिस्तानी गायक ऑल सेठी यांचाही समावेश आहे. त्याच्याशिवाय ब्लॅकपिंक, किड लारॉल, चार्ली एक्ससी लॅब्रिंथ, जय वुल्फ, जॉय क्रुक्स, जल पॉल, फ्रँक ओशन आणि अंडरवर्ल्ड यासह आंतरराष्ट्रीय कलाकारांनी ही त्यांची उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.