“त्या” विधानावरून अभिनेता फरहान अख्तर विरोधात पोलिसात तक्रार दाखल

नवी दिल्ली : “सोशल मीडियावर नको, आता थेट मैदानात भेटा” असे ट्विट करुन लोकांना मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात येऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन अभिनेता फरहान अख्तर याने दोन दिवसांपूर्वी केले होते. परंतु त्या विरोधात आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

करुणा सागर यांनी फरहान विरोधात तक्रार दाखल केली. फरहान दलित, मुस्लिम आणि नास्तिक लोकांमध्ये भय निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. असा आरोप करुणा सागर यांनी केला आहे. करुणा सागर या हैदराबाद येथे वकिल म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते हिंदू संघटन या संस्थेचे कार्यकर्ता देखील आहेत.
सोशल मीडियाचा वापर देशातील नागरिकांमध्ये आराजकता निर्माण करण्यासाठी करत आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील दलित, मुस्लिम आणि नास्तिक लोकांमध्ये एक प्रकारचे भय निर्माण होत आहे. असे आरोप करुणा सागर यांनी आपल्या दिलेल्या तक्रारीत केले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून फरहानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा