खरीप हंगामाच्या मशागतीमध्ये शेतकरी मग्न

इंदापूर, दि. १३ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील परिसरात असलेल्या शेतकऱ्यांनी सध्या खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात केली असून बैलांच्या व ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरट करण्यात शेतकरी बांधव मग्न आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे हवामान खात्याने सांगितले असल्याने तसेच पूर्वमोैसमी पावसाचे वातावरण चांगले असल्याने व या वर्षी मान्सून वेळेवर दाखल होणार या आशेने इंदापूर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून जमिनीची नांगरट करून घेत आहे. नांगरट झाल्यानंतर जमीन चांगली तापू द्यावी लागते  व पावसागोदर शेणखत शेतात टाकून पाळी घालावी लागत असल्याने परिसरातील शेतकरी आतापासूनच तयारीला लागला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेतातील कामाच्या  तयारीला लागला आहे. मागील ७/८ वर्षापासून पडलेल्या दुष्काळामुळे या वर्षी नक्की चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच आजकाल बैलजोडी नामशेष झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करावी लागत आहे. त्यासाठी त्यांना एकरी २ ते ३ हजार दर द्यावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा