मंठा तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित

मंठा, जालना १६ जुलै २०२४ : जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी परीसरात मागील वर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने पेरणी उशीरा तीही रीमझीम पावसावरच झाली होती. मात्र या वर्षी लवकर आणि अगदी वेळेवर पेरणीयोग्य पाऊस पडल्याने, शेतकऱ्यांनी जून महिन्यातच पेरणी झाली. शेतीची कोळपणी, खुरपणी, वखरणी, तसेच तणनाशकाची फवारणी करून शेतमोठ्या दमदार पावसाची वाट पाहत होते. काल झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नदी नाले भरून वाहत असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलय.

एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर समाधानकारक पाऊस झाल्याने, यावर्षी जनावरांना चारा वैरण आणि पीक पाणी व्यवस्थीत होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाने शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला असून उद्याची आषाढी एकादशी असल्याने पंढरीचा विठोबा पावला अशी चर्चा होताना दिसत आहे. आजही रीमझीम पावसाच्या सरी कोसळत असून पिकांनी हिरवा शालू नेसल्याचे चित्र सर्वत्र दिसतेय.

न्यूज अनकट प्रतिनीधी : राजकुमार कांगणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा