शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा – आ. राणा जगजीतसिंह पाटील

10

उस्मानाबाद, २० ऑक्टोबर २०२०: माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा आज दिनांक २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा पार पडला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी. केंद्र सरकार कडून मदत मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतच आहोत; परंतु, पंचनामे करण्यात अडकून वेळ घालवण्यापेक्षा या प्रसंगातून त्वरित बाहेर काढणे आवश्यक आहे, असे या दौऱ्या दरम्यान आ. राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले.

यासोबतच, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी साधलेल्या आपुलकीच्या संवादामुळे, तसेच त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आधारामुळे या अडचणीच्या प्रसंगातून लवकरच बाहेर पडता येईल असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. आता शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपण सर्वजण मिळून यातून नक्कीच मार्ग काढू शकतो, असे देखील आमदार राणा जगजीतसिंह पाटील या दौऱ्या दरम्यान म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा