शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करतांना कृषी सेवा केंद्राची पक्की पावती घ्यावी- कृषी अधीक्षक

जालना १५ जुलै २०२४ : बियाणे किंवा खताबाबतची शेतकऱ्यांना तक्रार करायची असल्यास कृषी सेवा केंद्राची पक्की खरेदी पावती आवश्यक असल्याचे कृषी अधीक्षक जालना यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करताना कच्ची पावती घेतल्यास कृषी विभागाशी संबंधित बियाणे कंपनी किंवा कृषी केंद्रावर कारवाई करण्यास अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदीची रीतसर पक्की पावती घेऊनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदीच्या वेळी काही तक्रार असल्यास किंवा कृषी सेवा केंद्राकडून जादा दराने विक्री होत असल्यास, त्वरित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधावा. कोणतेही बियाणे खते किंवा कीटकनाशके जादा दराने विक्री करताना आढळून आल्यास, कृषी सेवा केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पॅकिंगवर नमूद वजनाइतके बियाणे किंवा खत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी भरारी पथकात, वजन मापे निरीक्षकांचा समावेश असून वजनाची पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

बियाणे, खते किंवा कीटकनाशक खरेदी करताना कृषी सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक असलेली पक्की पावती घ्यावी, असे आवाहन जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा