कृषी यांत्रिकीकरणाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; इंदापूर कृषी विभागाचे आवाहन

इंदापूर, ४ ऑक्टोबर २०२०: कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना शासनाच्या संबंधीत संकेस्थळावर अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर कृषी विभागाने केले आहे.

राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबविण्याचे ठरविले असून या अभियानाचे अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सरू झाली असनशासनाच्या ‘महा डीबीटी महा आयटीआय’ या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना अर्ज सादर करावेत. नेवासे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून अनुदानावर आधारित या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादा राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टिलर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, ट्रॅक्टर फवारणी यंत्र, मळणी यंत्र, मोगडा, पाचट कुट्टी, रिपर बाईंडर, मल्चर आदी अवजारांची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा