बारामती, १५ फेब्रुवरी २०२१: मागील दोन महिन्यापासून सातत्याने वाढ होत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींपासून आता शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रक, कार आणि बसेसनंतर आता सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टर शेतात दिसणार आहेत. फक्त हा सीएनजी गावागावात पोहोचलेला नसल्याने ग्रामीण भागात सध्या ट्रॅक्टरचा वापर होणे फारच अवघड आहे. डीझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता सीएनजी ट्रक्टर शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
शेतकरी डिझेलवर वर्षाला सरासरी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करतो. सीएनजीच्या वापराने तो हा खर्च दीड लाखांनी कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने नुकताच हा ट्रक्टर लॉंच केला आहे.
रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आता सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा जास्त असेल. डिझेलच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे.या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.
पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी खूप स्वस्त आहे. सीएनजी टँक टाइटपासून सील असल्यामुळे रिफ्यूलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव