महाविद्यालयाच्या सेवेत नसून सुध्दा विद्यापीठाने मान्यतापत्र दिल्याबद्दल रिपब्लिकन सेनेचे आमरण उपोषण

मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, १७ मार्च २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराविरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात हे अमरण उपोषण सोमवार (दि.१३ मार्च ) रोजी पासून विद्यापीठ परिसरात करण्यात येत आहे.

महाविद्यालयात प्राध्यापक नसतानाही शिवाजी तुळशीराम सुर्यवंशी यांना प्रभारी प्राचार्य म्हणून नेमणूक पत्र दिले.यात त्यांना साथ देणाऱ्या विद्यापीठाच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मिलिंद बनसोडे शहराध्यक्ष (छत्रपती संभाजीनगर) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. यावेळी शेषराव दाणे (जेष्ठ नेते ) काकासाहेब गायकवाड (रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष पश्चिम ) मिलींद बनसोडे (शहर अध्यक्ष ) विनोद वाकोडे (ता. अध्यक्ष पश्चिम ) आदी जण उपोषणत बसले आहे.

यासाठी मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

प्रकरण नेमके काय वाचा सविस्तर:-

१) पी. ई. एस. शारिरीक शिक्षण महाविद्यालय, नागसेनवन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून दि. २१/०६/२०११ रोजी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या शिवाजी तुळशीराम सुर्यवंशीला महाविद्यालयाच्या सेवेत नसून सुध्दा विद्यापीठाने दि. १०/०८/२०१६ रोजीचे मान्यतापत्र बेकायदेशीरपणे दिले असल्याने रद्द करण्यात यावे.

२) दि. १०/०८/२०१६ रोजीचे मान्यतापत्र मिळणेसाठी शिवाजी तुळशीराम सुर्यवंशीयास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मुख्य मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आधिकान्याच्या ज्ञानाचा उच्चांक, महाविद्यालयात अध्यापकच नसताना विद्यापीठाने शिवाजी तुळशीराम सुर्यवंशी यांना प्रभारी प्राचार्य म्हणून नेमणूक पत्र स्वतःच्या मनमानी पद्धतीने दिले. (संस्थेचे आदेश नसताना देखील) सविस्तर घटना पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे औरंगाबाद येथील पी.ई.एस. शारीरिक शिक्षण महाविदयालयातून जून २०११ साली गैरवर्तुणीकीच्या कारणावरून छावणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल व तात्पुरत्या सेवेत असलेल्या बडतर्फ अध्यापक शिवाजी सूर्यवंशी यांना मा. प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट यानी संस्थेचे आदेशपत्र नसतांना सुद्धा ०५ जानेवारी २०२३ रोजी प्रभारी प्राचार्य म्हणून नेमणूक आदेशपत्र काढले व आपल्या अतिशिक्षित अज्ञानाचा उपयोग करून जी व्यक्ती जून २०१५ पासून आजतागायत २०२३ पर्यंत शारीरिक शिक्षण महाविद्यालयात अध्यापक म्हणून कामच करीत नाही व प्राचार्य पदासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेच्या नियमांचे उल्लंघन करून विद्यापीठाच्या शातिर अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनमानी पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा