गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लातुरमध्ये भीषण अपघात; चार जण ठार तर अनेकजण जखमी

लातुरमध्ये भीषण अपघात; चार जण ठार तर अनेकजण जखमी

लातुर, ०४ ऑक्टोबर २०२२: लातुर जिल्ह्यातील उदगीर रस्त्यावरील हैबतपुरवाडी नजीक आज एका चार चाकीचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की चारजण जागीच ठार झाले आहेत आणि एसटी बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस ही उदगीरहून लातुरला जात असताना हैबतपुरवाडी येथे आली असता बसचे पुढचे चाक निखळले आणि एसटी बसचा पुढचा भाग समोरून येणाऱ्या चारचाकी वर पडला, हा अपघात एवढा भीषण होता की, चारचाकीचा संपुर्णत: चेंदामेंदा झाला आहे.

या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक पोलिसही तातडीने या ठीकाणी पोहचले. सर्वानी मिळून बचाव मोहीम सुरु केली. प्रथम जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान अपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाला होता. परंतू अद्याप त्यांची ओळक पटली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. लातुर महामार्गावर अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version