आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; बस- कंटेनरच्या धडकेत ४ ठार
इटावा, २३ ऑक्टोबर २०२२: उत्तर प्रदेशच्या इटावा येथील आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण रस्ता अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इटावा (उत्तर प्रदेश): यात्रियों को लेकर गोरखपुर से अजमेर जा रही एक स्लीपर बस की आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर ऐक्सीडेंट हो गई। घटना में 4 लोगों की मौत हो गई और गंभीर रूप से घायल 42 लोगों को सैफई के पीजीआई अस्पताल में भर्ती कराया गया है। https://t.co/zQjgmlMXYc pic.twitter.com/BltSkKPYak
— ANI_HindiNews (@AHindinews) October 23, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर इटावा येथील सैफईच्या चॅनल क्रमांक १०३ जवळ एका वेगवान डबलडेकर बसची एका चालत्या कंटेनरला धडक बसली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही बस गोरखपूरहून अजमेरला जात असताना कंटेनरला धडकली. ही घटना शनिवारी रात्री दोन अडीचच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. हा अपघात कसा झाला, त्यामागील कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या एडीएमने सांगितले की, बस स्लीपर होती. बसमध्ये ६० हून अधिक लोक होते. जखमींना सैफई येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांची ओळख पटली असून यामध्ये आशी उर्फ श्रेया (७) रा. आग्रा, हमीद अली (३५), सुमेरसिंग गुर्जर (५२) आणि सोनू कुमार चतुर्वेदी (३२, राजस्थान) यांचा मृत्यू झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक