पुणे, २६ सप्टेंबर २०२२: पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाजवळ कारचा मोठा अपघात झाला. साताऱ्याहून पुण्याकडे येत असताना पाऊस जोरात पडत होता. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकाला धडकली.
कारचा वेग ईतका होता की, कार दुभाजकाला धडकून वीस फुट उंच उडाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. कार उडाल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावून पडली. सुदैवाने समोरुन कुठलीही गाडी येत नसल्याने मोठा अनर्थ झाला नाही. कारमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
मात्र कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाता नंंतर पुणे-सातारा महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आव्हान केले आहे की पावसाळ्यात वाहने जपून चालवावेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर