पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार

पुणे, १३ एप्रिल २०२३ : पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील चेलाडी फाटा नसरापूर येथे ही घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना समोर येत आहे. दादा बाळू खुडे (वय ४६, रा. चेलाडी फाटा, नसरापूर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ शेटे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून साताराकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने महामार्ग ओलांडणाऱ्या दादा खुडे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये खुडे गंभीर जखमी झाले. सौरभ शेटे, कुणाल भगत व प्रतीक चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत खुडे यांना उपचारासाठी नसरापूरमध्ये एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, दादा खुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाडपुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार

पुणे, १३ एप्रिल २०२३ : पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील चेलाडी फाटा नसरापूर येथे ही घटना घडली आहे. रस्ता ओलांडत असताना कंटेनरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे. दादा बाळू खुडे (वय ४६, रा. चेलाडी फाटा, नसरापूर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ शेटे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून साताराकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर महामार्ग ओलांडणाऱ्या दादा खुडे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये खुडे गंभीर जखमी झाले. सौरभ शेटे, कुणाल भगत व प्रतीक चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत खुडे यांना उपचारासाठी नसरापूरमध्ये एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, दादा खुडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा