भारतीय नौदलाचे जनक

पुणे, ४ डिसेंबर २०२२: आज “भारतीय नौदल दिन” यानिमित्त या महापुरुषाचं स्मरण करणं आवश्यक. ते म्हणजे Father of Indian Navy छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ३०० वर्षांपूर्वी आरमार प्रमुख दौलत खान यांना सोबत घेऊन समुद्रामध्ये आरमार स्थापन केलं.

आरमार प्रमुख दौलत खान हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच नाही तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांसोबत देखील त्यांनी १६८० ते १६८९ या काळात आरमार पदावर राहत समुद्रातील कित्येक लढाया लढत स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं.

शिवरायांचा इतिहास सांगताना स्वराज्याचा शत्रू अफजल खान तर सांगितला जातो मात्र स्वराज्यासाठी आपलं योगदान देणारा स्वामिनिष्ठ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा असलेले दौलत खान मात्र सांगितले जात नाहीत. हा शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासावर केला गेलेला अन्याय राहील.

भारतीय नौदल दिनाच्या सर्व नौदल सैनिकांना शुभेच्छा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा सलाम. बरंच काही दिलंय महाराजांनी, त्याला जपणं, त्याचं संवर्धन करणं ही जबाबदारी आपली. जय जिजाऊ, जय शिवराय…

  • पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा