लव्हे ता.(माढा) ८ ऑगस्ट २०२०:लव्हे येथील चव्हाण वस्ती परिसरात गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास बिबट्याने चार शेळ्या अर्धवट खाऊन लोकांची चाहूल लागताच धूम उडवली दिवसभरात वीज पुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना शेतात जावे लागते दरम्यान या भागात बिबट्या,तरस,लांडगे,रानडुक्कर अशा हिंस्र प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे प्राण्याच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी अशी माहिती संतोष चव्हाण यांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लव्हे शिवारातील चव्हाण वस्ती या परिसरात पाहणी केली असता त्या प्राण्यांच्या पायाचे ठसे पाहून तो बिबट्या नसून तरस किंवा लांडगा असल्याचे सांगितले परंतु काही शेतकऱ्यांनी त्या प्राण्यांचा आवाज ऐकला आहे तो आवाज बिबट्याचाच असल्याचे सांगितले मृत शेळ्यांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन वनविभागाचे वनरक्षक कुरले यांनी दिले यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी विवेक शिंदे वनपाल साळुंके वनमजुर तानाजी दळवी अशोक यादव तलाठी आर जी पांडेकर पोलीस पाटील विठ्ठल सुतार माजी सरपंच बंडू देशमुख सुखदेव सुतार तानाजी चव्हाण अरुण चव्हाण यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी -प्रदीप पाटील