उरळी कांचन, दि. १३ जुलै २०२०: कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना प्रसार नियंत्रणात येत नसल्याने पुणे शहर व शहरालगतच्या गावात सोमवारी दिनांक १३ जुलै मध्यरात्रीपासून दहा दिवसाचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २३ जुलै मध्यरात्रीपर्यंत लॉकडाउन सुरू राहील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लॉक डाऊन च्या पहिल्या पाच दिवसात म्हणजे दिनांक १८ जुलै पर्यंत फक्त दूध आणि औषधाच्या विक्रीला परवानगी असेल १९ ते २३ जुलै सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत थोडी शिथिलता आणली जाणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तू चा साठा करण्यासाठी तीन दिवस मिळाले आहेत. नागरिकांना भाजीपाला व किराणा खरेदी करण्यासाठी वेळ मिळाला आहे तरी सुद्धा नागरिक भाजी- पाला व किराणा साठी गर्दी करत आहेत. त्यामुळे उरुळी कांचन व परिसरात मात्र नागरीक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियम तोडत असताना शनिवारी दिसले.
त्यामुळे कोरोनाचा धोका भविष्यात अधिक वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. उरुळी कांचन येथे एकाच दिवसात तेरा कोरना रुग्ण आढळून आले असून शहरात कोरोनाचे ५९ रुग्ण झाले आहेत. मात्र असे असताना सोशल डिस्टंसिंग भान नागरिकांमध्ये नाही अशी परिस्थिती आहे. लोकडाऊन वाढणार या भीतीने किराणा मालाच्या दुकानात पुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुकानदार ग्राहकांना सूचना देत होते मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाउनच्या काळात कोणाचीही गय केली जाणार नाही व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कुठेही गर्दी करू नये जो सहकार्य करणार नाही त्यांच्यावर खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली. लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असून ही गर्दी पाहिल्यानंतर प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे