हा फेब्रुवारी महिना ठरला १२० वर्षातील दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी

नवी दिल्ली, २ मार्च २०२१: या वर्षाचा फेब्रुवारी महिना १२० वर्षातील दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी होता. या महिन्याचे सरासरी तापमान २७.९ अंश आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १२० वर्षांत हा दुसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी आहे. हवामान खात्याने १९०१ पासून आत्तापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे ही माहिती दिली आहे. हवामान खात्याने सांगितले की, फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमान २७.९ डिग्री होते.

यापूर्वी १९६० मध्येही फेब्रुवारीचे सरासरी तापमान २७.९ डिग्री सेल्सिअस होते. तर २००६ मध्ये १२० वर्षांत फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण राहिला होता. या महिन्याचे सरासरी तापमान २९.७ अंश सेल्सिअस होते.

यापूर्वी, २५ फेब्रुवारी, गुरुवारी राजधानी दिल्लीत उष्णतेने मागील १५ वर्षाचा विक्रम मोडला. बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान ३२.५ अंश नोंदविले गेले. त्याचबरोबर किमान तापमानही सामान्यपेक्षा १२ अंश जास्त सेल्सिअस नोंदविण्यात आले.

जास्तीत जास्त तापमानाच्या बाबतीत, २००६ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा फेब्रुवारी महिन्यात तापमान ३२.५ अंशांवर पोहोचले. यापूर्वी २६ फेब्रुवारी २००६ रोजी दिल्लीत ३४.१ अंश तापमान नोंदवले गेले होते.

२४ फेब्रुवारीचा दिवस हा आतापर्यंतचा २०२१ चा सर्वात उष्ण दिवस होता. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दिल्लीचे तापमान १४.७ डिग्री नोंदविण्यात आले. हवामान खात्याचे वैज्ञानिक कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, २००६ पूर्वी २००४ मध्ये सर्वाधिक तापमान ३२.५ नोंदविण्यात आले होते.

त्याच वेळी, १९९३ मध्ये ते ३३.९ वर पोहोचले होते. यावेळी १० फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यानंतर कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत होती. सतत वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की या वेळी उष्णता उच्चतम स्तरावर असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा