गोल पोस्ट कट्टा सहज फेवीक्विक मधल्या आजीबाईंचे निधन

फेवीक्विक मधल्या आजीबाईंचे निधन

नवी दिल्ली: अजय देवगनच्या ‘रेड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री पुष्पा जोशी(वय ८५) यांचे मंगळवारी (दि.२६) रोजी निधन झाले.
रेड चित्रपटात पुष्पा यांनी अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांच्या कामाबद्दलही त्यांचे खूप कौतुक झाले.

नुकत्याच फेवी क्विकच्या एडमध्ये त्या झळकल्या होत्या. येथूनच त्यांना स्वॅगची आजी म्हणून ओळखले जाऊ लागले. गेल्या आठवड्यात पुष्पा जोशी घरात घसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना फ्रॅक्चर झाले होते.
रेड चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version