फाशीच्या शिक्षेमुळे डिप्रेशनमध्ये आहेत निर्भयाचे आरोपी

तिहार: अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी निर्भयाच्या आई-वडिलांच्या मृत्यू वॉरंट जारी करण्याच्या व सर्व दोषींच्या फाशीची मागणी करण्याच्या याचिकेवरील सुनावणी १८ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळं फाशीची शिक्षा आता पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता १७ डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे तर १८ डिसेंबरला पाटिलाया हाऊस कोर्टात सुनावणी होईल. दरम्यान निर्भयाच्या आईने शुक्रवारी सांगितले की, १६ डिसेंबरपूर्वी दोषींना फाशी देण्यात यावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून तिच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मी झगडत राहणार आहे. १६ डिसेंबरपूर्वी तिला फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे.”
दोषींना फाशी देण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तिहार कारागृह महासंचालक संदीप गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तुरूंगात भेट दिली. यासाठी या हायप्रोफाईल प्रकरणात कोणतीही माहिती लिक होऊ नये यासाठी तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या फोनवरही पाळत ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी महत्त्वाची माहिती मीडियाला दिली आहे. तिहार कारागृहात (Tihar Jail) निर्भया बलात्कार-खून खटल्यातील चारही दोषी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं जेवनही कमी झालं आहे. जेलमधील सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चार दोषींसह चार-पाच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून ते स्वत: ला काही नुकसान करून घेऊ नये.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा