लखनौच्या लेवाना हॉटेलमध्ये भीषण अग्नीतांडव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

5

लखनौ, ५ सप्टेंबर २०२२ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या लेवाना हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीमध्ये काही नागरिक अडकून पडल्याचेही सांगितले जात असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर चालू आहे. आग लागलेले हॉटेल लखनौमधील हजरतगंज भागात आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू तर २४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अडकलेल्या नागरिकांना हॉटेलच्या काचा फोडून बाहेर काढले जात आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लेवाना हॉटेल हे लखनौ रेल्वे स्टेशनपासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे. हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशनदेखील आहे. हॉटेलमधील आगीच्या धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलमध्ये एकूण ३० खोल्या आहेत, त्यापैकी १८ खोल्यांमध्ये नागरिक होते. पहिल्या मजल्यावर बँक्वेट हॉल असून, सर्व खोल्या मिळून हॉटेलमध्ये तीस ते ३५ नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी २४ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

आगीत जखमी झालेल्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, आतापर्यंत २४ हून अधिक लोकांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, अडकलेल्या इतर नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अजून पण कळू शकलेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा