फिफा विश्वचषक : उपांत्य फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, ९ डिसेंबर २०२२: फिफा विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने आता सुरू होणार आहेत. याच सामन्यांचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. फिफा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉल प्रेमींनी कतारमध्ये गर्दी केली. पहिल्यापासूनच कतारमध्ये सुरू झालेल्या रोमांचक सामन्यांना फुटबॉल प्रेमींची दाद मिळत आहे. आणि आता क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे.

क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल चे वेळापत्रक :
९ डिसेंबर- रात्री ८.३० वाजता ब्राझील विरुद्ध क्रोएशिया
९ डिसेंबर- रात्री १२.३० वाजता अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड
१० डिसेंबर- रात्री ८.३० वाजता पोर्तुगाल विरुद्ध मोरक्को
१० डिसेंबर- रात्री १२.३० वाजता इंग्लंड विरुद्ध फ्रान्स

आठ टीम सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत‌. त्यामुळे चार टीम्सचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि मेस्सीचा अर्जेंटिना हे दोन्हीही संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. पण अर्जेंटिनाची मॅच सेमी फायनलमध्ये नेदरलँड विरुद्ध होणार आहे. तर पोर्तुगालची मॅच मोरक्कोसोबत होणार आहे. त्यामुळे फुटबॉल प्रेमींना मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातील सामना पाहता येणार नाही.

तर कॉर्टर फायनल आणि सेमी फायनलच्या सामन्यानंतर, अनुक्रमे १३ आणि १४ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता सेमी फायनलमधील निवडून आलेल्या ४ संघांमध्ये २ सामने होतील. तर सूत्रानुसार १७ डिसेंबर रोजी तिसऱ्या क्रमांकासाठी पराभवीत झालेल्या दोन संघांमध्ये रात्री ८.३० वाजता सामना होईल. आणि अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता खेळवला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा