डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए पदवीधरांचा ड्रायव्हर, कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी लढा

पुणे, १३ जानेवारी २०२३ : सरकारी नोकऱ्यांची क्रेझ नेहमीच राहिली आहे. राज्य कोणतेही असो; देशात सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा अशी आहे, की अनेक सुशिक्षित लोक अगदी छोट्या पदांसाठीही लढत आहेत. या सत्याला पुष्टी देणारी बातमी पुन्हा एकदा आली आहे. पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी डॉक्टर, इंजिनिअर आणि एमबीए पदवीधरही रांगा लावत आहेत. हा पुणे पोलिस भरतीचा विषय आहे. जेथे अनेक पदवीधारकांनी ड्रायव्हर, कॉन्स्टेबलच्या रिक्त जागांसाठी अर्ज केले आहेत. पुणे पोलिस भरती २०२३ ची प्रक्रिया सुरू असून, एकूण ७९२ पदांची भरती होणार आहे. त्यापैकी ७२० कॉन्स्टेबल भरतीसाठी, तर ७२ सरकारी चालकांसाठी आहेत. या सरकारी नोकरीसाठी पात्रता १२वी उत्तीर्ण आहे; मात्र आतापर्यंत आलेल्या अर्जांची आकडेवारी थक्क करणारी आहे.

सध्या केवळ ७२ ड्रायव्हर पदांसाठी अर्ज आले आहेत, ज्यांचे फॉर्म ३ जानेवारीला प्रसिद्ध झाले आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. TOI च्या अहवालानुसार, आतापर्यंत ७३,२४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २,३९० असे उमेदवार आहेत ज्यांनी एका किंवा दुसर्‍या शाखेत पदवी पूर्ण केली आहे. तर ८४८ पदव्युत्तर आहेत. कोणती पदवी धारण करणाऱ्यांकडून किती अर्ज आले आहेत, याची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
बी.फार्म. : ८५ अर्ज
बीबीए : २२२
बीसीए : ५१५
बीई (अभियांत्रिकी पदवी) : ८७६
B.Tech (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) : १७१
BCS : ३९४
एमबीए : २८१
MCA : २४२
MCS : ३२
एमएसडब्ल्यू : ९८
एमएस्सी : ३६८
होमिओपॅथी, आयुर्वेद यांसारख्या वैद्यकीय पदवी मिळविलेल्या अनेक उमेदवारांनीही अर्ज केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेवर देखरेख करणारे पुणे पोलिस (गुन्हे) अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी TOI ला सांगितले, की बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या क्षेत्रातील चांगले ज्ञान आहे. ते केवळ तेजस्वी आणि हुशारच नाहीत तर शारीरिक आणि लेखी परीक्षांमध्येही चांगली कामगिरी करतात. त्यांची क्षमता पोलिस दलाच्या गरजा भागवते. याशिवाय त्यांना MPSC/UPSC परीक्षेत बसण्याची संधी आहे.

स्पर्धात्मक सेलचे प्रभारी एजाज बागवान यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की ‘लोकांमध्ये अजूनही सरकारी नोकऱ्यांची क्रेझ आहे. कारण त्यामुळे त्यांना नोकरीची सुरक्षा मिळते. अनेक सुविधा, निवास आणि उत्तम वैद्यकीय कवच प्रदान करते. इथे खासगी नोकरीसारखी नोकरी जाण्याची भीती नाही. यापूर्वी देखील अशी प्रकरणे पाहिली गेली आहेत. जिथे अगदी अभियंता, डॉक्टर आणि पीएच.डी.धारकांनी शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा