मुंबई २८ जून २०२३: इंस्टाग्रामवर ‘फायटर’ चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करताना हृतिकने लिहिले, “फाइटर… २५ जानेवारी २०२४… ७ महिने बाकी…” शेअर केलेल्या फोटोमध्ये हृतिक युनिफॉर्म घातलेल्या गेटअप मध्ये, फायटर जेटजवळ उभा असल्याचे दिसत आहे. ‘फायटर’मध्ये दीपिका पदुकोण हृतिकसोबत दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत असुन सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच निर्मात्यांनी त्याच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले.
हृतिक रोशनने त्याच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केल्यानंतर, चाहत्यांनी या चित्रपटाला ‘टॉप गन’ची कॉपी म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉम क्रूज अभिनीत हॉलिवूड चित्रपट ‘टॉप गन’ ची कथा देखील एका पायलटची होती. हृतिकच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला ‘टॉप गन’ची कॉपी म्हटले आहे. त्याचबरोबर अनिल कपूर, झोया अख्तर, संजीदा शेख आणि पश्मिना रोशनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर या चित्रपटाला ‘टॉप गन’ची कॉपी म्हणत लोकांनी ट्रोल करण्याचं कारण म्हणजे, हृतिकचा युनिफॉर्म घातलेल्या गेटअप चा लूक आणि फायटर प्लेन. असा सेम लूक टॉम क्रूझचा ‘टॉप गन’ मध्ये होता. या चित्रपटात तो यूएस नेव्ही पायलट लेफ्टनंट पीट मॅवेरिक मिशेलच्या भूमिकेत दिसला होता. ‘टॉप गन’ ही हॉलिवूडची प्रसिद्ध अॅक्शन फिल्म आहे. हा चित्रपट १९८६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचा दुसरा भाग ३६ वर्षांनंतर म्हणजे २०२२ मध्ये रिलीज झाला.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.