कलिंगड खाण्यावरून मजूरांमध्ये हाणामारी

इंदापूर, दि.६ मे २०२० : इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील एका खासगी मंगल कार्यालयात मंगळवारी( दि.५) रोजी अचानक १०० हुन अधिक मजूरांची भर पडली. अगोदरच दोनशेहून जास्त मजूर लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यांचे जेवणावरून आज(बुधवारी) अक्षरशः तुंबळ हाणामारी झाली. मात्र या तीनशेहुन जास्त मजूरांच्या सुरक्षेसाठी फक्त एक पोलीस कर्मचारी तैनात आहे. बुधवारी दुपारी या मजूरांना कलिंगड वाटप करण्यात येत होते. मात्र यामध्ये कसल्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग पाळण्यात येत नव्हते. यामध्ये अनेक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

एक वेळच्या जेवणाची भ्रांत या ठिकाणी असते. दुपारी कलिंगड वाटपावेळी या मजुरांमध्ये अक्षरशः तुंबळ हाणामारी झाली. फक्त पोट भरण्यासाठी हे मजूर कोणतीही चूक नसताना केवळ प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एकमेकांवर हात उचलत असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.

या कार्यालयात शेकडो मजूर कोणत्याही शिस्तीविना आहेत. त्यामुळे परिसरातील स्थानिक कमालीचे घाबरले आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी “न्युज अनकट” शी बोलताना केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा