अंजिराला मिळतोय विक्रमी भाव…

पुरंदर, २८ डिसेंबर २०२०: सध्या अंजिराच्या हंगाम सुरू आहे. कमी पाण्यात येणार पीक म्हणून पुरंदरच्या अनेक भागात हे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी आंजिर उत्पादन घेतात.गेल्या काही वर्षात अंजिराचे भाव पडलेले पाहायला मिळाले. मात्र यावर्षी अंजिराला विक्रमी भाव मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.

पुरंदरच्या उत्तर भागातील काळेवाडी, दिवे या गावातून तर पश्चिमेला वाल्हे, आडचीवाडी, पींगोरी या भागात आंजिराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दर वर्षी आंजिराच्या कोसळत चाललेल्या भावामुळे अनेकांनी आंजिरच्या बागा काढून टाकल्या आहेत. अंजीरसाठी प्रसिद्ध असलेल्या राजेवाडी आंबळे या गावातून तर आता अंजीर बाग दिसेनाशी झाली आहे. दर वर्षी कमी होणारे बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च व मजुरांची कमतरता, तसेच लहरी हवामान यामुळे पुरंदर मधील अंजीर बागांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, यावर्षी अंजिराच्या भावाने उचांकी दर गाठला आहे.गेल्या १५ वर्षात मिळालेल्या भावा पैकी या वर्षी आंजिराला मिळालेला हा उचंकी भाव असल्याचे येथील शेतकरी निलेश झेंडे यांनी सांगत आहेत. यावर्षी अंजिराच्या चार डजनाच्या पेटीला ३५० ते ३८० रुपये असा विक्रमी भाव मिळत आहे. त्यामूळे उत्पादन कमी असले तरी येथील शेतकरी सुखावला आहे.

याबाबत बोलताना दिवे येथील शेतकरी निलेश झेंडे म्हणाले की, “आम्ही १५ वर्षा पासून आंजिरचे उत्पादन घेतो.या पंधरा वर्षात केव्हाच एवढा भाव मिळाला नव्हता. अतीवृष्टिने अनेक बागांचे नुकसान झाले, फळही कमी लागले, त्यामूळे बाजारात अंजिराची टंचाई निर्माण झाली.मागणी पेक्षा पुरवठा कमी पडत असल्याने भाव वाढले आहेत”.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा