शहरातील नामांकित डॉक्टरांच्या विरोधात वाईट नजरेने बघत हातवारे केल्याचा गुन्हा दाखल.

बारामती,३१ जुलै २०२०: बारामती शहरातील नामांकित डॉक्टर, डॉ.विशाल मेहता व नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिला (रा. वडगाव निंबाळकर ता बारामती जि पुणे) यांनी विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत पुढील प्रमाणे. वडगाव निंबाळकर येथील महिला दि १५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान डॉ मेहता यांच्या संभाजी नगर येथील हॉस्पिटलमध्ये तिच्या वहिनीला भेटायला गेली होती. त्यानंतर रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस करायला त्या डॉ मेहता यांच्या कॅबिन मध्ये गेल्या असता डॉ विशाल मेहता यांनी लॉकडाऊनच्या काळात ऑपरेशन करता येत नाही असे आम्हास शासनाचे आदेश आहेत. व रुग्णाचे वय लहान असल्याने ऑपरेशन करता येत नाही. असे म्हणत डॉ मेहता यांनी माझ्याकडे वाईट नजरेने बघुन माझ्याकडे अश्लील हातवारे करत माझा विनयभंग केला व मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली.

त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता या महिलेने रिसेप्शन काउंटर वर जाऊन तिथे असणाऱ्या नितीन जाधव यांना रुग्णाच्या डिस्चार्ज बाबत डॉ मेहता यांना विचारण्यास सांगितले असता त्यानेही मला उर्मटपणे बोलत दमदाटी व शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी महिलेने डॉ विशाल मेहता व नितीन जाधव यांच्या विरूध्द दि २९ रोजी रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पुढील तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा