भाजपा आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल

गोपीनाथ गड, दि. २२ मे २०२०: भाजपाचे नवनिर्वाचित विधानसभेचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीनाथ गडावर ते आणि त्यांचे काही कार्यकर्ते दर्शनासाठी गेले होते. परंतु , तेथे सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ते तिथे गेले होते. काही दिवसांपूर्वी विधानसभेची बिनविरोध निवडणूक झाली ज्यामध्ये रमेश कराड यांना भाजपाकडून आमदारकी जाहीर करण्यात आली होती. आपल्याला आमदारकी मिळाल्यानंतर कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू करेन असे त्यांनी सांगितले होते. हेच काम पूर्ण करण्यासाठी ते आज गोपीनाथ गडावर गेले होते.

ते गडावर जाण्यापूर्वी तिथे त्यांचे वीस-पंचवीस कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश कराड गोपीनाथ गडावर पोहचल्यावर त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांनी सोबत दर्शन घेतले व ते पुढे निघाले. यावेळेस तेथे पोलिस प्रशासन देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम होत असताना त्यांच्याकडून कोणतेही सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. रमेश कराड व इतर २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा