लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणात दीप सिद्धू आणि गुंड लक्खा सिधानाविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, २८ जानेवारी २०२१: काल २६ जानेवारी ला दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. ज्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांची परवानगी घेतली होती. यासाठी पोलिसांना शेतकऱ्यांना मार्ग देखील ठरवून दिला होता. मात्र ऐन परेड च्या वेळी आंदोलन अचानक हिंसक झाले आणि दिल्लीत गदारोळ माजला. राजेवाल यांनी याबाबत कट रचल्याचा आरोप देखील केला आहे. शेतकरी आपले आंदोलन शांततेने करत होते पण काही उपद्रवी आले आणि आंदोलन हिंसक बनवले.

२६ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि गुंड लक्का सिधानाविरोधात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपद्रव करणाऱ्या दोघांच्या भूमिकेबाबतही चौकशी सुरू आहे.

अभिनेता दीप सिद्धू फेसबुक वर असे म्हणाले होते की, लोकशाहीच्या अधिकाराणुसर मी आंदोलनात सहभागी झालो होतो आणि निशाण साहेब यांचा झेंडा लाल महालावर फडकवला होता, परंतु मी तिरंगा तेथून काढला नव्हता. घटनेच्या दोन दिवस अगोदर दीप सिद्धू आणि गुंड लखा सिधाना दिल्ली येथे आले होते. सिंह यांनी सीमेवरील रेड लाइटवर बसलेल्या शेतकर्‍यांमध्ये भडकाऊ भाषण देखील दिले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा