झारगडवाडीतील वाळू चोराविरोधात गुन्हा दाखल

बारामती (झारगडवाडी), १० जानेवारी २०२१: कऱ्हा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे १ लाख ६५ हजार रुपयांची वाळू उपसा केल्याप्रकरणी पोपट शिवलाल निकम (रा. झारगडवाडी ) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात चोरी व खाण खनिज अधिनियम तसेच महाराष्ट्र जमिन महसूल संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाव कामगार तलाठी राजकुमार शिवराम पवार यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. झारगडवाडी गावकऱ्यांनी दि.४ जानेवारी रोजी तहसीलदारांकडे पोपट निकम हे कऱ्हा नदी पात्रातून मशीनने वाळू उपसा करत असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार तहसीलदारांनी पाहणी करुन कारवाई करण्याचे आदेश गाव कामगार तलाठ्यांना दिले होते.

दि.७ रोजी तलाठी पवार व गाव कोतवाल हनुमंत थोरात यांनी नदी पात्रात गेले असता नदीपात्रातील जेसीबी मशीनच्या साह्याने निकम यांनी वाळू उपसा केल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. नदीपात्रातील पंचनामा केला असता अंदाजे ३० ब्रास वाळूची चोरी झाल्याचा आरोप आहे. नदीतून १ लाख ६५ हजार रुपयांची वाळू चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा