फाईलवर शेरा मराठीतच लिहावा : मुख्यमंत्री

मुंबई : सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, सरकारी कामकाज आणि व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सरकारने केंद्राला पत्र दिले आहे.
रंगभवन येथे मराठी भाषाभवन उभारण्याच्या आधीच्या सरकारच्या निर्णयाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
प्रशासनातील अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीतच लिहावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाइल परत पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, देसाई हे पत्रकार दिनानिमित्त मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान बोलत होते, त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा