फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण, एका विद्यार्थ्याची हकालपट्टी केल्याने आंदोलन

पुणे १६ मे २०२३ : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने(FTII) गेल्या आठवड्यात २०२० बॅचच्या ५ विद्यार्थ्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संस्थेतून काढून टाकले होते. ५ पैकी ४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी नंतर मागे घेण्यात आली. पण एका विद्यार्थ्यावर केलेली कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. या कारवाई विरोधात FTII चे विद्यार्थी सोमवारी संध्याकाळपासून कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

FTII विद्यार्थी संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजीच्या तातडीच्या शैक्षणिक परिषदेत संस्थेच्या विभागप्रमुखांनी दिलेल्या, रीमिडयल असाइनमेंट आणि एक्सरसाइज या विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर, पाच पैकी,चार विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेश देण्यात आला. तर एका विद्यार्थ्याला पुढच्या बॅचसह दुसरे सत्र पुन्हा करण्याचे सांगून त्याला प्रवेश शुल्क भरण्यास सांगण्यात आले.

संस्थेने एका विद्यार्थ्याला बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेन केला आहे. FTII संस्थेने या विद्यार्थ्याच्या हकालपट्टीसाठी क्रेडिट आणि उपस्थितीची कमतरता यासह अनेक कारणे दिली आहेत. सर्व विद्यार्थ्यांची हकालपट्टी रद्द होईपर्यंत वर्ग सुरू होऊ देणार नाही असे २०२० बॅचच्या विद्यार्थ्यांनी जाहीर केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा