गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेकलाकारांनी डीपी बदलून महाराष्ट्र पोलिसांचा केला सन्मान

सिनेकलाकारांनी डीपी बदलून महाराष्ट्र पोलिसांचा केला सन्मान

मुंबई, दि.११ मे २०२० : सध्या करोना योद्धांच्या सन्मानासाठी मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्रामवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही असाच डीपी ठेवून पोलीसांना सन्मान द्या, असे भावनिक आवाहन बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने केले आहे.

याशिवाय बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजे अजय देवगण, शाहरुख खान, अक्षयकुमार, माधुरी दिक्षित आदी सिलेब्रिटींनी देखील आपापले डीपी बदलून महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचा गौरव केला आहे.

सध्या सोशल मिडीयावरील डीपी बदलणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विद्या बालन, कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, दिशा पटनी, विकी कौशल, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आदींचा समावेश आहे.

कोरोनाच्या काळात रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी सन्मान व्यक्त करावा, असे यानिमित्ताने त्याला वाटत आहे. सध्या सगळे घरी आहेत, कुटुंबियांसमवेत आहेत. पण हे सर्व कोरोना वॉरियर जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यामुळे ‘या योद्धांच्या सन्मानासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल मीडिया अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवावा’, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्या आवाहनाला बॉलिवूडकरांनी प्रतिसाद देत आपले डीपी बदलून पोलिसांचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version