गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा अखेर ४ वर्षांनंतर ‘हा’ अभिनेता दिसणार मोठ्या पडद्यावर!

अखेर ४ वर्षांनंतर ‘हा’ अभिनेता दिसणार मोठ्या पडद्यावर!

मुंबई, ३ डिसेंबर २०२२ बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याचा ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.

किंग खान मागील ४ वर्ष होता तरी कुठे? इतके वर्ष चित्रपटांपासून दूर राहण्याचे नक्की कारण काय ?त्यामागचे कारण नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले आहे. या ब्रेकचे मोठे कारण म्हणजे माझ्या आयुष्यातली एक खास व्यक्ती म्हणजे माझी मुलगी सुहाना. याबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला की, माझी मुलगी विदेशात शिक्षण घेत होती. त्यामुळे तिला कधीही एकटे वाटू शकेल आणि तिचा मला फोन येईल आणि ती मला तिकडे बोलवेल असे मला वाटायचे, म्हणून मी कोणतेही काम घेतले नाही.

मी नेहमी वाट बघत बसायचो की, ती मला आता फोन करेल मग फोन करेल…पण तिने या काळात मला एकदाही एकटे वाटत आहे किंवा तुम्ही या म्हणून फोनच केला नाही. त्यामुळे एक दिवस मीच तिला फोन करून म्हटले की तू मला फोन का करत नाहीस ?

यावर सुहानाने दिलेले उत्तर फारच छान आहे. ती म्हणाली, तुम्ही काम का करत नाही? तुम्ही काम करा मी इकडे खुश आहे. त्यामुळे, तुम्ही येण्याची गरज नाही. त्यानंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला.

दरम्यान, २०२३ मध्ये शाहरुख खानचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये शाहरुख बरोबर दिपीका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version