अखेर ई-पास हद्दपार

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात अनलॉक ४ ची नियमावली जाहीर करताना राज्य सरकार ने ई-पास रद्द केला आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून सध्या राज्यात प्रवासासाठी ई-पास अनिवार्य होता. या ई-पास प्रणालीवर गेल्या काही दिवसांपासून मोठी टीका होत होती. तर ई-पास चालू ठेवणं म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीचं उल्लंघन असेल, असंही केंद्र सरकारने बजावलं होतं.
केंद्र सरकारनं याबाबत आधीच राज्य सरकारांना जिल्हा बंदी उठवण्यासाठी आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. १ सप्टेंबर पासून अनलॉक चार सुरू होणार आहे, आणि याची नियमावली अखेर राज्य सरकारने आज जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हा बंदी उठवण्यात आली आहे. म्हणजेच आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी  ई-पास ची आवश्यकता नसणार.
खरंतर आधीपासूनच याबाबत मागणी राज्यातील नागरिकांकडून करण्यात येत होती. परंतु देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती जास्तच गंभीर होत चालली असताना राज्य सरकारने ही मागणी रोखून धरली होती. परंतु, आता जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी कोणतेही बंधन नसणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा