अंबाला, १० सप्टेंबर २०२०: भारत आणि चीन यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भारतीय वायुसेनेचे सामर्थ्य आणखीन वाढले आहे. आज फ्रान्समधून आलेले पाच राफेल लढाऊ विमान भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्लेदेखील अंबाला एअरबेसवर उपस्थित होते.
सर्व प्रक्रिया निशी ही पाच राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाली. जेथे प्रथम पूजा केली गेली, त्यानंतर फ्लाईपास करण्यात आला. यावेळी तेजस, सुखोई यांच्यासह वायुसेनेच्या इतर अनेक विमानांनी एअर शोमध्ये भाग घेतला आणि परिसरातील वॉटर गन च्या सलामीने राफेल लढाऊ विमानांना वायुसेनेच्या ताफ्यात सामील करून घेतले. जेव्हा जेव्हा एखादे नवीन लढाऊ विमान हवाई दलात समाविष्ट होते तेव्हा या प्रक्रियेचे अनुसरण केले जाते.
२९ जुलै रोजी फ्रान्समधील पाच राफेल लढाऊ विमान भारतात दाखल झाली, परंतु अधिकृतपणे ते आज हवाई दलात सामील झाले आहेत. यावेळी, अंबालाच्या एअरबेसवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया उपस्थित होते. पहिल्या हप्त्यात पाच विमानांसह हवाई दलाला एकूण ३६ लढाऊ विमाने फ्रान्सकडून मिळणार आहेत.
हवाई दलातील राफेल लढाऊ विमानाचा गोल्डन अॅरो १७ स्क्वॉड्रॉनमध्ये समावेश असेल. कारगिल युद्धामध्ये याच स्क्वाड्रनने पाकिस्तानला सळो कि पळो करून सोडले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अंबाला एअरबेसवर त्यांची उपस्थिती शत्रूला चकित करू शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे