गोल पोस्ट महाराष्ट्र अखेर हडपसर मध्ये एस. आर. पी. एफ. चे जवान दाखल

अखेर हडपसर मध्ये एस. आर. पी. एफ. चे जवान दाखल

हडपसर, दि. २० मे २०२०: हडपसर येथे आज बुधवार दि.२० मे २०२० रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हडपसर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पोलिसांची जरब राहावी, नागरिकांनी घराबाहेर पडून नये या उद्देशाने २४ तास बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत पथसंचलन केले. सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. तसेच टाळ्या, शंखनाद, पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोबल वाढवले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘महाराष्ट्र पोलिस दलाचा विजय असो’ असा जयघोषही यावेळी करण्यात आला.

या संचलनाची सुरूवात तुकाईदर्शन, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसर गाव, गाडीतळ परिसरातून झाली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात त्याचा समारोप झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले.

“नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे, तसेच आपले विविध सण घरामध्ये बसूनच साजरे करावेत. कोरोनाची प्रादुर्भाव व व्याप्ती गांभीर्याने लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावाखाली सतत रस्त्यावर येऊ नये.” असे आवाहन पोलिसांनी “न्यूज अनकट” शी बोलताना केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version