अखेर खदखद बाहेर….

मुंबई, १९ जुलै, २०२२: रामदास कदमांनी शिवसेना सोडली, या वाक्यावर विश्वास बसणे, अत्यंत कठीण होते. पण अखेर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि या घटनेवरचे मौन सौडले. आज त्यांनी माध्यमांसमोर भावना व्यक्त करत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

असं नक्की काय घडलं की, रामदास कदम एवढे भावनाविवश झाले. त्यांनी अखेर आरोपांच्या फैरी झाडल्या. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला. उद्धव ठाकरेंनी नेत्यांच्या बैठका घेणं बंद केलं. त्यामुळे आमचा थेट संपर्क संपला. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना अशी कोसळताना पहावत नाही. असं त्यानी ठासून सांगितले. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं. याचं वाईट वाटतं. आदित्य ठाकरे माझ्या केबिनमध्ये येऊन तीन-तीन तास बसायचे आणि मिटींग लावण्याचे आदेश देत असत. तसेच प्लास्टिक बंदी मी केली, मात्र क्रेडिट आदित्य ठाकरेंना दिलं. पण त्यांना याची कदर नाही आणि आज शिवसेना कोसळण्याच्या मार्गावर आहे.

यावेळी राम कदम यांनी शरद पवारांवर घणाघात केला. शरद पवारांनी शिवसेना संपवली असं म्हणत त्यांनी शरद पवारांना जबाबदार ठरवलं. तर अजीत पवारांनी अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली, असा आरोप करायलाही ते विसरले नाहीत.
रामदास कदम यांनी राजीनाम्यात काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या होत्या. ज्यात त्यांनी सांगितले होते की, बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेबानंतर आता त्या पदाची कोणीही किंमत करत नाहीत. उद्धव ठाकरेंनी कोणत्याही शिवसेना नेत्यांना विश्वासात घेऊन काम केलं नाही. पक्षात माझा आणि माझ्या मुलाचा अनेक वेळा अपमान करण्यात आला. तसेच कोणीही तुम्हाला किंवा पक्षाला काहीही बोलल्यास मिडीयासमोर न जाण्याचे आदेश देण्यात आले. हा कुठला न्याय आहे.

५२ वर्ष मी सेनेसाठी लढलो, असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेनेवर घणाघात केला. अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत त्यांनी राजीनामा दिला.पण यामुळे शिवसेनेचे भवितव्य खरचं धोक्यात आले आहे. असेच जर आमदार आणि खासदार फुटत गेले, शिवसेना आता कोसळतीय. नंतर ढासळून जाईल, हेच वास्तव शिवसेना नेत्यांना डोळ्यासमोर पहावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा