अखेर पृथ्वीराज, जयंत पाटील बोलले….

मुंबई, २० जुलै २०२२: उद्धव ठाकरे आणि शिंदे गट अशी फूट पडल्यानंतर आजपर्यंत काँग्रेस मूग गिळून गप्प बसले होते. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने कुठलीच पावले उचलली नव्हती. पण अखेर आज पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावरचे मौन सोडले आहे.

यावेळी त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन मोठी चूक केली. त्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायला हवं, हे तितकंच खरं. त्यांनी आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. आपण महाविकास आघाडीचं सरकार का स्थापन केलं, यामागची संकल्पना सगळ्यांना समजावून सांगता आली असती.

हे सांगताना त्यांनी भाजपची काय रणनीती होती किंवा भाजपचा रोल नक्की काय होता? हे जनतेला समजावून सांगता आलं असतं. असं म्हणत आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी मतदान करुन जायला हवं होतं. जर त्या मतदानात ते हरले असते तरी पक्षांतर कायद्याचं उल्लंघन यात झालं नसतं. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे भाषण करुन निघून जायला हवे होते, असे मत पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलं.

जयंत पाटील यांनीही यावेळी माध्यामांसमोर सांगितले की, शिंदे गटात जायचे असेल तर जा. पण शरद पवारांच्या नावानी खडे फोडू नका. असं म्हणत शरद पवारांना पाठिंबा दर्शविला. मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं की, हा आजपर्यंतचा इतिहास आहे की, शिवसेना सोडून जाणारे कधीही निवडून आले नाहीत.
कदाचित काँग्रेसला आता कुणीही वाली राहिला नाही. ज्यामुळे आता ना घर का ना घाट का अशी काँग्रेसची परिस्थिती आहे. केवळ तोंडाच्या वाफा मोकळ्या करण्याशिवाय आता काँग्रेसकडे काहीच उरले नाही. एकेकाळी बलाढ्य असणारा पक्ष आता एकटा पडला आहे. पण रोज काँग्रेस नेता काय बोलणार कांग्रेसला इतर पक्ष किती गंभीरपणे घेतात, हे पहावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा