मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली लवकरच हे पद सोडणार आहे. त्यामुळे बीसीसीआय ला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली हा मागच्या तीन वर्षापासून ही जबाबदारी पार पाडत आहेत. आता भारताला १९८३ मध्ये पहिला विश्वचषक जिंकून देणारे संघात सहभागी असलेले, रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
दरम्यान सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष पद सोडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मीडियासमोर बोलताना गांगुली म्हणाले की ‘मी पाच वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मी तीन वर्षे बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो, या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला कधी ना कधी जावं लागतं. प्रशासकाचा कार्याल काल मर्यादितच असतो’, तुम्ही कायम कोणताही खेळ खेळू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही प्रशासक म्हणून आयुष्यभर कार्यरत राहू शकत नाही. मला क्रिकेट खेळण्याची आणि नंतर प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या दोन्ही भूमिका बजावताना मला खूप मजा आली. येथे स्थावर असं काहीच नाही. सर्व गोष्टी या वेळेनुसार बदलत असतात. बीसीसीआयमध्येही तसेच आहे तुम्ही आयुष्यभर बीसीसीआय मध्ये राहू शकत नाही. त्यामुळे इथे कोणीच परमनंट नाही याचा सर्वांनीच विचार करायला हवा.
काही मीडिया रिपोर्ट नुसार गांगुली पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्ष होण्यासाठी उत्सुक होते. मात्र गेल्या आठवड्याभरात झालेल्या बीसीसीआय च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकामध्ये अध्यक्ष म्हणून गांगुली यांच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे १९८३ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी यांना गांगुली ऐवजी अध्यक्ष पदाच्या नावाला पसंती देण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव