अखेर कोळविहीरे येथील अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांनी केली सुटका

पुरंदर, दि. ४ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामधील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काल सकाळी (दि.३) कोळविहीरे येथील राहणारी मुलगी तिच्या भावासोबत पुण्याहून घरी येत असताना दिवे घाटात असताना स्वीप्ट गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत या मुलीचे अपहरण केले होते. यानंतर त्या मुलीला शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर येवून पडली होती. देशात महिलांबाबतच्या अपराधाच्या घटना वाढत असतानाच पुणे जिल्यात अश्या प्रकरची घटना घडल्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्याच बरोबर पोलिसांपुढे कायदा व सुव्यावस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी ताबडतोप तपासाची सूत्रे फिरवून आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे या मुलीला व तिला पळवून नेणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिश पठाण, राहुल म्हेत्रे, हमजर पठाण, अविनाश चौगुले यांच्यावर भा.द.वी ३६६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना धेऊन सासवड व लोणी काळभोर पोलिसांचे पाथक आता परतीला निघाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा