मुंबई, दि. ४ जुलै २०२०: मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोविड -१९ च्या प्रकरणांची संख्या पाहता मुंबई पोलिसांनी रहिवासी ठिकाणापासून केवळ दोन किलोमीटरच्या परिघामध्ये प्रवास करता येईल अशी अट नागरिकांना घालण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी या अटीनुसार अनेक वाहनचालकांवर कारवाई देखील केली होती. यावरून नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता व या मातीचा विरोध केला होता. त्यानंतर राज्य सरकारने देखील आता मुंबई पोलिसांनी घातलेली ही अट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच असेदेखील आव्हान केले आहे की नागरिकांनी शक्यतो दोन किलोमीटरच्या आत मध्येच आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी कराव्यात किंवा आवश्यक कामे पूर्ण करावीत.
मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्वत्र नाराजी पसरली होती. ठाणे जिल्ह्यात पुन्हा टाळेबंदी लागू करणे, मुंबईत घरापासून दोन किमीच्या आत प्रवासास मुभा देणे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करणे यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्याबरोबरच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली. या सर्व घडामोडीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही अट रद्द केली असल्याचे जाहीर केले.
मुंबईत रविवार आणि सोमवार असे दोन दिवस अनेक वाहने जप्त करण्यात आली. यावरून महाविकास आघाडीच्या विरोधात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सुसंवाद असावा, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी