मुंबई, ९ ऑगस्ट २०२२: मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर अखेर आज मिळाले. तब्बल ३४ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला. विरोधकांनी हैराण केलेल्या या प्रश्नाने आज विरोधकांची बोलती बंद झाली. शिंदे आणि फडणवीस गटाकडून एकूण १८ जणांनी आज शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
यात राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रविंद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, अतुल सावे, शंभूराजे देसाई, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. आजच संभाव्य खात्याचे वाटप होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
या नवनिर्वाचित मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक मंत्री त्यांच्या कर्तृत्वामुळं पुढे आहेत, तर खातेवाटप होण्याआधी काही मंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडत आहेत. आता खरी शर्यत सुरु होणार आहे.
कोणाला कुठली खाती मिळणार, यावर असलेल्या वादावर अखेर पडदा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोणाला कुठली खाती मिळणार, कोण नाराज होणार तर कोण खुश होणार, हे पाहणं गरजेच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस