गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक अखेर मिर्ची चौकात पडला अतिक्रमणचा हातोडा

अखेर मिर्ची चौकात पडला अतिक्रमणचा हातोडा

नाशिक, २० ऑक्टोबर २०२२: औरंगाबाद माहामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या अपघातानंतर महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंबंधी दिलेली १५ दिवसांची मुदत संपल्याने मनपाच्या नगर रचना विभाग आणि अतिक्रमण विभागाने पोलीस फौज फाट्यासह मिरची हॉटेल व नाशिक वडापाव यांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे.

अजून या भागातील पक्के बाधकाम काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू झाले आहे. अपघातानंतर या भागातील सर्व धारकांना १५ दिवसांची अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही धारकांनी कोणतीही हालचाल केली नव्हती व या परिसरात पुढाऱ्यांचे जास्त प्रभाव असल्याने या परिसरात धारकांनी कोणतेही अतिक्रमण काढले नाही अशी माहीती समोर आली आहे‌.

पण आज मात्र अतिक्रमण काढण्याची मुदत संपल्याने महापालिकेच्या विभागाकडून सदर अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला आहे. संपूर्ण परिसर जमिनदोस्त करण्यात आले आहे. अशी माहीती महापालिका प्रशासनाने दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version