अखेर प्रतिक्षा संपली! विराट कोहलीचं वादळी शतक, षटकार लगावत शतकाचा दुष्काळ संपवला

पुणे, ९ , सप्टेंबर २०२२ : विराट कोहली काल पुन्हा एकदा भन्नाट फॉर्मात दिसला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. पण या सामन्यात त्याला पुन्हा एकदा लय सापडल्याचे पाहायला मिळाले. विराटने यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. कोहलीने यावेळी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक पूर्ण केले. विराट कोहलीला आपल्या ७० व्या ते ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने १०२०दिवस वाट पाहिली. ही प्रतीक्षा अखेर संपली. ८ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक असले तरी, विराटच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे ७१वे शतक झळकावले आहे.

मागील बऱ्याच काळापासून विराट कोहली धावा काढण्यासाठी झुंजत होता. अनेक प्रयत्न करूनही त्याला धावा करता येत नव्हत्या. मात्र अखेर आज त्याने आपल्या कारकिर्दीतील ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात तब्बल १०१९ दिवसांनी त्याने ही कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे धावा करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती. विराटने काही दिवसांसाठी आराम करावा असा सल्लाही दिला जात होता. मात्र आता तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना दिसत असून त्याची प्रचिती आज आली आहे. त्याने आपले शतक ११ चौकार आणि चार षटकार लगावत पूर्ण केले. आपल्या पूर्ण खेळीत त्याने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत १२२ धावा केल्या.

दरम्यान, विराटने शेवटचे शतक २३नोव्हेंबर २०१९ रोजी ठोकले होते. बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला होता. त्याचबरोबर, विराटने आशिया कप २०२२ च्या सुपर ४ सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ११चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५३चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट १८८.६८ होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा