फायनान्स कंपनीने ग्राहकांना हप्त्या साठी तगादा लावू नये: नारायण शिरगावकर

बारामती, दि. ३ जुलै २०२०: आज दिनांक शुक्रवार दि २ रोजी बारामती शहर पोलिसांनी कोरोना संसर्गाच्या धर्तीवर फायनान्स कंपन्यांकडुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे कर्जदारांकडून वसूली करावी असे आदेश असताना देखील फायनान्स कंपनीचे वसूली कर्मचारी हे सर्रास अरेरावीची भाषा करत दबाव टाकत आहेत. काही दिवसांपूर्वी बारामती शहर पोलिसांनी शहरातील डॉक्टरांना वसुली साठी दम देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. असे प्रकार घडू नये याविषयी समज देण्यासाठी आज शहरातील सर्व फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

बारामती पोलीस स्टेशन मध्ये आज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व बारामती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी बारामती शहरातील फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. विविध फायनान्स कंपनीचे मॅनेजर व वसूली अधिकारी यांनी कोरोना संसर्गाचे संकट असताना नागरिकांकडे काम नाही आर्थिक अडचण आहे. तरी देखील फायनान्स कंपनीचे खातेदारांकडे असणारी थकीत बाकी असल्याने वसूली अधिकारी हे कर्जदार कडुन जबददस्तीने कर्ज वसूली करीत असून अरेरावी करत आहेत. असे निर्दशनास आले आहे. तरी फेब्रुवारी २०२० पर्यंतचे कर्जदारांचे थकीत हप्ते हे वसूल करताना वसूली कर्मचा-यांना फायनान्स कंपनीने कर्मचाऱ्यांना समज दयावी त्यांनी महिलांशी सैजन्याने वागावे तसेच कर्ज वसूली करत असताना त्यांचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे फायनान्स कंपनीने वसूली करणाऱ्या लोकांची सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता केलेली असावी. त्याच प्रमाणे मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यत आर.बी.आय च्या निर्देशाप्रमाणे कर्जवसुलीकरीता स्थगिती दिली आहे. जर आपण आर.बी.आय ने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात येतील.

त्याबाबत कर्जदार यांना कपंनीकडे अर्ज करून मुदत वाढवून घेणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने कर्जाबाबत कोणत्याही नागरिकांना त्रास देवू नये तसेच हप्त्याबाबत तगादा लावू नये व ग्राहकांच्या कर्जावर खरेदी केलेल्या वस्तू वसुली अधिका-यां मार्फत जबरदस्तीने हिसकावून घेण्यात येवू नये याबाबत आज बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. या मीटिंग मध्ये बजाज फायनान्स, ए यु बँक फायनान्स, एच डी बी फायनान्स, टाटा फायनान्स, महिंद्रा फायनान्स, चोला मंडल फायनान्स, सुंदरम फायनान्स, श्रीराम फायनान्स इत्यादी सर्व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

खाजगी फायनान्स कंपनीच्या वसूली कर्मचाऱ्यांच्या अरेरावीच्या विरोधात शहरातील राजे ग्रुप व ऍड भार्गव पाटसकर, ऍड निलेश वाबळे यांनी आवाहन केल्यावर अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्यावर त्यांनी वारंवार फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनाशी पत्र व्यवहार व चर्चा केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा